काँग्रेस पक्ष गाव तेथे शाखा स्थापन करणार – सातलिंग शटगार.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/02/2026 :
काँग्रेस पक्ष संघटना बांधणीसाठी
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज माढा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक टेंभुर्णी येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार याचे स्वागत माढा तालुकाध्यक्ष संजय पाटील व टेंभुर्णी शहर अध्यक्ष हेमंत देशमुख यांनी केले
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात गाव तेथे काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करणार असून वाड्या वस्त्यावर ,छोटी गावे या ठिकाणीही काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करून संपूर्ण जिल्हा काँग्रेस मय करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण व मंडळ अध्यक्षांची नेमणूक करावी अश्या सूचना ही देण्यात आल्या.तसेच तालुक्यातील गंभीर प्रश्न,शेतकऱ्याचे प्रश्न, किंवा इतर प्रश्न, या प्रश्नासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात समोर भव्य आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्षांनी केले. यावेळी काँग्रेस सभासद नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. असे सांगितले
या बैठकीस माढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय पाटील, कुर्डूवाडी शहर अध्यक्ष फिरोज खान, जिल्हा सरचिटणीस जहीर मणेर,जिल्हा मीडिया सेलचे प्रमुख सचिन खैरे- पाटील,अशोक आप्पा पाटील,टेंभुर्णी शहर अध्यक्ष हेमंत देशमुख,विकास माने, राहुल क्षीरसागर,संतोष नवले,गणेश नवले, राहुल देवकर,निलेश गवळी,अमर राकुंडे,जमीर काझी विकास डोके, दादा लांडगे,किरण पवार, राजू खोचरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.