वन विभागाकडून मेंढपाळ यशवंत बेडगे यांना २० हजार रुपये नुकसान भरपाई
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
चिपरी – कोल्हासदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात चिपरी( ता. शिरोळ ) येथील यशवंत बेडगे या मेंढपाळास वन विभागाकडून मेंढ्यांच्या कोकरांची भरपाई म्हणून २० हजार रुपये देण्यात आले. नुकसान भरपाई मिळावी म्हणून यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा चिपरी येथे मेंढपाळांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि मेंढपाळ यशवंत सूर्याप्पा बेडगे, संदीप बेडगे, रमेश बेडगे, बापू मरळे, रा. चिपरी ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांच्या सुमारे ३०० मेंढ्यांचा कळप खतासाठी जैनापुर येथील शेतकरी रावसो पाटील यांचा पाटील मळा (गट नं. १९०) शेतात बसायला असताना बुधवार दि ११ जुन रोजी रात्री ११ ते १२ वा. दरम्यान कोल्हासदृष्य वन्य प्राण्यांच्या कळपाने तळावर हल्ला केला. वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात बेडगे यांच्या मेंढरांच्या ९ कोकरांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी व २ बेपत्ता झाली होती..
नुकसान भरपाई मिळण्यासाठी वनपाल संजय कांबळे वनरक्षक अरुण खामकर वनमजूर हरिबा जाधव व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जितेंद्र कुरुंदवाडे, यांचे सहकार्य मिळाले. नुकसान भरपाई मिळाल्यानंतर चिपरी येथील मेंढपाळ यशवंत बेडगे यांच्या सह सर्व मेंढपाळांनी एकत्र येऊन यशवंत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन यशवंत क्रांती संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. रामचंद्र गावडे, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले मंगेश मरळे यांनी आभार मानले.
सत्कार कार्यक्रमास यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, जिल्हा संघटक पिंटू गावडे, सावर्डे शाखाध्यक्ष तानाजी शेळके, मेंढपाळ यशवंत बेडगे. रमेश बेडगे. बापू मरळे. संदीप बेडगे. शाहीर गावडे. कुमार मरळे. मारुती गावडे. मंगेश बेडगे. संजय मरळे. दादासो मोरडे. सागर गावडे. इरगोंडा गावडे रामचंद्र गावडे , मंगेश मरळे , बाचु बेडगे , सर्जेराव शेळके व मेंढपाळ उपस्थित होते.