सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्या प्रतिष्ठानच्या
ए.आय. सेटर ला भेट
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/02/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पदविका आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची औद्योगिक भेट विद्या प्रतिष्ठान बारामती येथील शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशल इंटेलिजन्स या ए.आय. सेंटरला भेट देण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
या औद्योगिक भेटीदरम्यान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स भेट देणे अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरले सविस्तर स्पष्टीकरणे, प्रात्यक्षिके ,आणि संवाद सत्रांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग च्या वास्तविक जगातील अनुप्रयोगांबद्दल मौल्यवान अंतर दृष्टी प्रदान केली ज्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवहारिक समज आणि उद्योगातील अनुभव मोठ्या प्रमाणात वाढला. तसेच विद्यार्थ्यांना उद्योगातील कार्यपद्धती, कम्प्युटर मशीन यंत्रसामग्री, डेटा सेंटर,आय.ओ.टी. डिवाइस , शेती क्षेत्रातील नवीन टेक्नॉलॉजी ड्रोन,कम्प्युटर उपकरणांची देखभाल तसेच औद्योगिक सुरक्षितता नियमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उद्योगातील शिस्तबद्ध कामकाज, सुरक्षिततेचे महत्त्व व व्यावसायिक कार्यसंस्कृती याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या औद्योगिक अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात शिकविल्या जाणाऱ्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक वापर समजण्यास मदत होईल. हा अभ्यासदौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच न्यू टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या व्यावसायिक दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला.
प्रत्येक यंत्रणा आणि त्यांची कार्यप्रणाली याबद्दलच्या शिक्षकांच्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना खूप काही शिकता आले. विविध उपकरणे त्यांची सुरक्षा प्रणाली आणि त्यांच्या वापराचे महत्त्व समजून घेतल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची खरी क्षमता कशी आहे हे कळाले. या औद्योगिक भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात नक्कीच फायदा होईल. या औद्योगिक भेटीमध्ये प्रथम वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि इलेक्ट्रॉनिक टेलीकमुनिकेशन इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या औद्योगिक भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले व डिप्लोमा प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. झंजे एस. एस., ए.आय.एम.एल. विभागाचे विभाग प्रमुख प्रा. शेख व्ही. एम., इ.अँड टी.सी. विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. बोंद्रे एस. एस.. प्रा.क्षीरसागर जे. बी. आणि प्रा. सपकाळ ए.डी. यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.