विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/02/2026 :
शालेय जीवनात नेहमी वेगवेगळ्या परीक्षा असतात, स्पर्धा असतात. कोणी जिंकते कोणी हरते. जिंकण्याचा आनंद तात्कालिक असतो. पुन्हा स्पर्धा होत राहतात आणि हार-जीत बदलत राहते.
आपण एखादी स्पर्धा जिंकलो म्हणजे कायमस्वरूपी अजिंक्य नसतो. हरलेला थोडा कमी पडलेला असतो. पुढच्या स्पर्धेत तो वरचढ होऊ शकतो. त्यामुळे जिंकलो तरी कोणाला कमी समजू नये हे महत्वाचे.
मुलांनो, यश-अपयश येते जाते. परस्परांशी वागताना समानतेने वागा. यश डोक्यात जाऊ देऊ नका. अहंकार करू नका. अध:पतानाला कारणीभूत असणाऱ्या अहंपणाला जवळ करू नका.
सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुढे जातो तो खरा यशस्वी होतो.
सौ. स्नेहलता स. जगताप.