मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/02/2026 :
श्रीमंती ही अशी गोष्ट आहे की ती सर्वांना भुरळ घालते. सर्वांनाच श्रीमंत व्हायला आवडते. गरिबी कोणालाच आवडत नाही पण श्रीमंती-गरिबी ही स्थिर नसते आणि ती आपल्या आवडण्यावर नसते.
श्रीमंती जपता आली पाहिजे. श्रीमंतीचा पण एक थाट असतो, रुबाब असतो, तेज असते पण ते सर्व नम्रपणे स्वीकारुन, वावरता आले पाहिजे. श्रीमंतीमध्ये लीनता, विनयशीलता, संवेदनशीलता, नीतिमत्ता, माणुसकी हे सर्व मूल्ये असतील तर ती श्रीमंतीला अधिक श्रीमंत बनवतात.
गरिबांची जाणीव ठेवणे, त्यांना पण सन्मानाची वागणूक देणे, गरजेला उपयोगी पडणे, आपुलकीने वागणे, समानतेने वागणे, समोरच्याला माणूस समजणे या गोष्टी ज्याला जमतील तो खरा श्रीमंत.
आजचा संकल्प
पैशांनी श्रीमंत किंवा गरीब असले तरीही नीतिमूल्ये जपत असलेले व माणसाशी माणसासारखे प्रेमाने वागणारे खरे श्रीमंत हे लक्षात घेऊ व आपण प्रत्येकजण आपली श्रीमंती समृद्ध करू.
सौ. स्नेहलता स. जगताप