पुरुषोत्तम बैसकार यांची शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्काराकरिता निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
यवतमाळ प्रतिनिधी दिनांक 19/03/2026 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सन 2023-24 साठी लेखकांच्या गटातून पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर, श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ यांना जाहीर झाला आहे. त्यांनी साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी. एस टी. अँड मॅनॅरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी.चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी बैसकार यांच्या निवडीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.