!! अष्टदिशा माहिती !!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/7/2026 :
भारतीय वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करताना आपण अष्टदिशांना महत्त्व देतो.अष्ट म्हणजे आठ या शब्दाला आपल्या भारतात अनेक दृष्टीकोनातून महत्त्व आहे.
उदा:अष्टपैलू,अष्टदिशा,अष्टगुणसंपन्न,अष्टप्रधान, अष्टलक्ष्मी, अष्टविनायक,अष्टौप्रहर,“अष्टपुत्र सौभाग्यवती भव’ सारखे प्राचीन आशीर्वाद,अशा अनेक संकल्पनांमधून आठ या आकड्याचे महत्त्व दिसून येते.
!! अष्टदिशा !!
पूर्व,आग्नेय,दक्षिण,नैऋत्य,पश्चिम,वायव्य,उत्तर, ईशान्य या आठ दिशा आहेत.
*१) पूर्व दिशा :-*
या दिशेचा दिशापालक इंद्र देव आहे.त्याची पत्नी शची देवी आहे.त्याचे नगर (पूर) अमरावती आहे.
त्याचे वाहन पांढरा हत्ती (ऐरावत) आहे.त्याचे आयुध वज्रायुध हे आहे.या दिशेची राशी मेष (१),
वृषभ (२) आहे.या दिशेचा रंग श्वेत (पांढरा) आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला ऐश्वर्यं लक्ष्मीचे स्थान आहे.या दिशेचा ग्रह सूर्य (रवी) हा आहे.
*२) आग्नेय दिशा :-*
या दिशेचा दिशापालक अग्नी देव आहे.त्याची पत्नी स्वाहा देवी व सदा देवी आहे.त्याचे नगर (पूर) तेजोवती आहे. त्याचे वाहन मेंढा आहे.
त्याचे आयुध भोप (रोज) / राग (क्रोध) हे आहे.
या दिशेची राशी मिथुन (3) आहे.या दिशेचा रंग लाल / तांबडा आहे.अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धान्य लक्ष्मीचे स्थान आहे.या दिशेचा ग्रह शुक्र हा आहे.
*३) दक्षिण दिशा :-*
या दिशेचा दिशापालक यम देव आहे.त्याची पत्नी शामला देवी आहे.त्याचे नगर (पूर) संयमनी आहे. त्याचे वाहन महिष आहे.त्याचे आयुध कालपाश हे आहे.या दिशेची राशी कर्क (४),सिंह (५) आहे.या दिशेचा रंग लाल आहे.अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला आदि लक्ष्मीचे स्थान आहे.या दिशेचा ग्रह मंगळ हा आहे.
*४) नैऋत्य दिशा :-*
या दिशेचा दिशापालक नैऋती देव आहे.त्याची पत्नी दीर्घा देवी आहे.त्याचे नगर (पूर) कृष्णांग आहे.त्याचे वाहन नर (मनुष्य) आहे.त्याचे आयुध कुंत हे आहे.या दिशेची राशी कन्या (६) आहे.या दिशेचा रंग धूम्र आहे.अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धैर्य लक्ष्मीचे स्थान आहे.या दिशेचे ग्रह राहू – केतू हे आहेत.
*५) पश्चिम दिशा :-*
या दिशेचा दिशापालक वरुण देव आहे.त्याची पत्नी कालिका आहे.त्याचे नगर (पूर) श्रद्धावती आहे.त्याचे वाहन मगर आहे.त्याचे आयुध पाश हे आहे.या दिशेची राशी तुल (७) व वृश्चिक (८) आहे.
या दिशेचा रंग लाल,तांबडा व काळा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला गज लक्ष्मीचे स्थान आहे.या दिशेचा ग्रह शनीदेव हा आहे.
*६) वायव्य दिशा :-*
या दिशेचा दिशापालक वायूदेव आहे.त्याची पत्नी अंजनी देवी आहे.त्याचे नगर (पूर) गंधवती आहे.
त्याचे वाहन हरीण आहे.त्याचे आयुध ध्वज हे आहे.या दिशेची राशी धनु (९) आहे.या दिशेचा रंग पांढरा,निळा,काळा,करडा आहे.अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला विजय लक्ष्मीचे स्थान आहे.या दिशेचा ग्रह चंद्र हा आहे.
*७) उत्तर दिशा :-*
या दिशेचा दिशापालक कुबेर देव आहे.त्याची पत्नी चित्रलेखा देवी आहे.त्याचे नगर (पूर) अलकावती आहे.त्याचे वाहन पांढरा घोडा आहे.
त्याचे आयुध खडग हे आहे.या दिशेची राशी मकर (१०),कुंभ (११) आहे.या दिशेचा रंग पिवळा, पोपटी,हिरवा,पिवळसरपांढरा आहे.अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धन लक्ष्मीचे स्थान आहे.या दिशेचा ग्रह बुध हा आहे.
*८) ईशान्य दिशा :-*
या दिशेचा दिशापालक देवाधिदेव महादेव आहे. त्याची पत्नी सती देवी व पार्वती देवी आहे.त्याचे नगर (पूर) कैलास (हिमालय) आहे.त्याचे वाहन वृषभ (बैल) आहे.त्याचे आयुध त्रिशूळ हे आहे.या दिशेची राशी मीन (१२) आहे.या दिशेचा रंग हिरवा,पांढरा आहे.अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला संतान लक्ष्मीचे स्थान आहे.या दिशेचा ग्रह गुरु हा आहे.