मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 06/02/2026 : लेखनात जशा लहानशा गोष्टी शब्दाचा अर्थ बदलतात तशा जीवनात पण छोट्या छोट्या गोष्टी आपले भावविश्व बदलतात. आपल्या मनात एक असते मात्र समोरचे अर्थ वेगळे काढतात.
मनात असणे, मनाला लागणे, मनात बसणे, मनातून उतरणे यासारख्या उदाहरणांवरून आपल्या हे लक्षात येईल.
प्रत्यय बदलला की अर्थ बदलतो.
जीवनात माणसे बदलली की संदर्भ बदलतात. नाती बदलली की अर्थ वेगवेगळे घेतले जातात. शब्द तेच असतात पण बोलणारी व्यक्ती, ऐकणारी व्यक्ती व संदर्भ बदलले की अर्थ बदलतात.
आजचा संकल्प
शब्द तेच असले तरी संदर्भ बदलले की अर्थ बदलतात हे लक्षात घेऊ व त्या प्रमाणे योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर करू.
सौ. स्नेहलता स. जगताप