“यशवंत क्रांती” मुळे वनविभाकडून मेंढपाळास ४२ हजार रुपये नुकसान भरपाई
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/02/2026 : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढरांच्या कोकरांची नुकसान भरपाई म्हणून पोखर्णी व नागाव ता. वाळवा येथील मेंढपाळांना वनविभागाकडुन ४२ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. नुकसान भरपाई मिळावी यासाठी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून संजय वाघमोडे यांनी पाठपुरावा केला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि मेंढपाळ पोपट सिसाळे रा. नागाव व विष्णू बादरे रा. पोखर्णी, यांच्या मेंढरांच्या कोकरांवर वन्यप्राण्यांनी हल्ला करून पोपट सिसाळे यांची ९ तर विष्णू बादरे यांच्या ८ कोकरांना ठार मारले होते.
वन विभागाकडून पोपट सिसाळे, नागाव यांना २७ हजार रुपये व विष्णू बादरे पोखर्णी, यांना १५ हजार रुपये नुकसान भरपाई पोटी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
नुकसान भरपाई मिळाल्यानंतर नागाव ता वाळवा येथे मेंढपाळांच्या वतीने संजय वाघमोडे व मेजर काशिलिंग कोळेकर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षक म्हणून सेवा निवृत झाले बद्दल संजयकुमार सिसाळे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास दादासो गावडे, उत्तम तांदळे, भिमराव गावडे, प्रमोद सिसाळे, रामचंद्र सिसाळे, राजेंद्र सिसाळे, संभाजी सिसाळे,उदय सिसाळे, ओंकार सिसाळे,शुभम सिसाळे,सोमाजी सिसाळे, योगेश सिसाळे, तुषार सिसाळे, अरविंद सिसाळे, अजित सिसाळे,दिपक सिसाळे, सुर्यकांत सिसाळे, नामदेव बादरे, उत्तम बादरे, विष्णू बादरे,विनय बादरे, नागाव शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.