साहेबांच्या गळाला लागू नका…
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 08/02/2026 :
अरे, अमोल असं का रे…???
अरे मला देवाचा सांगावा आला होता हे खरं आहे…
माझ्या विमानाचा अपघात झाला होता हे खरं आहे…
माझी पोरं माझ्या अस्थी विसर्जन करत आहे हे मी बी बघतोय आणि तुमी बी…
तरी तुम्ही दादा मेले नाहीत. ती बॉडी दादांची नव्हतीच हे काय चालवलंय…???
अरे, कुठं राजकारण करावं आणि कुठं राजकारण करू नाही हे तुम्हाला कळायला हवं रे. असं मेलेल्या माणसाचं राजकारण करू नये. त्यात पुन्हा माझ्यासारख्या माणसाच्या मरणाचं असं राजकारण करणं शोभतं का रे तुम्हाला…!!!
आणि माझ्यासमोरून तोंड काळं करण्यापूर्वी आणखी एक सांगतो. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबद्दल मी कधीही काहीही बोललो नव्हतो. एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांच्या उमेदवारांना मी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सांगितलं होतं ते आठवतंय का रे?
अरे,
मुंबईत आपण ३ जागा जिंकल्या, साहेबांनी १.
पुण्यात आपण २७ जागा जिंकल्या साहेबांनी ३.
त्याहून भयानक म्हणजे २९ पैकी १८ महानगरपालिकांमध्ये साहेबांच्या पक्षाला साधं खातं उघडता आलं नाही. आता मला सांग काय कारण आहे त्यांच्या मागे जायचं. एकत्र यायचं.
एकत्र यायचंच असेल तर “साहेबांनी त्यांचा पक्ष आपल्या पक्षात विलीन करत असल्याचं जाहीर करावं. संपला विषय”. पण साहेब तसा शब्द उच्चारणार नाहीत. त्यामुळे काकाच्या गळाला लागू नका. आणि माझ्या शपथा घेऊन माझी इच्छा होती हे तर बोलूच नका. नाहीतर एकेकाला इथे घेऊन येईन. मग बघतो कोण कसं एकत्रीकरण करतो ते.
विजय शेंडगे, पुणे