श्री गजानन महाराज प्रगट दिन साजरा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/02/2026 :
निर्वाण 108 रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांचे शिष्य बाळासाहेब रंगनाथ गवसनणे (रा. पद्मावती नगर नऊचारी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांचे “रुद्र पशुपती” निवासस्थान इथे श्री गजानन महाराज प्रगट दिन धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी रुद्राभिषेक, श्री सत्यनारायण पूजा, दुपारी बारा वाजता पुष्पृष्टी नंतर महाप्रसाद, संध्याकाळी भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.