साळवे 卐 कांबळे मंगल परिणय सोहळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/02/2026 :
आयु. मारुती तात्याबा साळवे (गुरुजी) व आयु. रमेश मारुती साळवे(पत्रकार) रा. सुमित्रानगर- यशवंतनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची सुकन्या उपासिका प्रणाली व कालकथित पांडुरंग नाना कांबळे यांचे नातू व आयु. दत्तात्रय पांडुरंग कांबळे रा. बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांचे कनिष्ठ चिरंजीव उपासक सुनील यांचा मंगल परिणय सोहळा रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 : 45 वाजता थाटाने संपन्न झाला.
याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधूवरांना शुभाशीर्वाद दिले.